पिंपरी : उद्योगनगरी असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडी परिसरात असलेल्या एका स्टील यार्ट कंपनीच्या मशीनमध्ये कामगार अडकून त्या कामगाराचे धड शरीरावेगळे झाले आहे. या अपघातात कामगारचा मृत्यू झाला असून अंगावर शहारे आणणारी ही घटना आहे.
मोहनलाल जोखनप्रसाद गौतम असे मृत झालेल्या कामगाराचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेश येथील राहणारा आहे. प्रकरणी चिखली पोलिसांनी कंपनीचे मालक फैयाज उमर शेख आणि फारुख उमर शेख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पिंपरी चिंचवड परिसरातील चिखली परिसरात स्टील यार्ड नावाची कंपनी आहे. या कंपनीत मोहनलाल हा काम करत होता. मात्र मोहनलाल याला मशीन चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता. त्याने कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नव्हते. तसेच ही मशीन चालविताना त्यावर ठेवणारे कोणी कामगार नसताना अपघात होऊ शकतो हे माहिती असताना सुद्धा कंपनीचे मालक
मालक फैयाज उमर शेख आणि फारुख उमर शेख यांनी त्याला मशीन चालवण्यास भाग पाडले. त्यावरून चिखली पोलिसांनी दोघांवर मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे.
या घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एका ऐ्रांनीवर आहे. पिंपरी चिंचवडच्या अनेक भागांमध्ये छोट्या कंपन्या आहेत. या छोट्या कंपन्यांमधून अनेक कामगार आपला उदरनिर्वाह करत आहेत. मात्र अशा घडला घटना घडल्यामुळे कामगारांची सुरक्षा पुन्हा एकदा वाऱ्यावर असल्याचे पाहायला मिळते. कोणतेही दक्षता न घेता कामगारांना त्या कामाची कुठली माहिती नसता त्याला कामावर ठेवले जाते. त्यातूनच अशा प्रकारच्या घटना घडत असतात. ही घटना हे त्याचेच उदाहरण असल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणी अधिक तपास चिखली पोलिसांकडून केला जात आहे.