पुणे : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे सर्वच मतदार संघात राजकीय घडामोडी घडतं आहेत. त्यातच आंबेगाव तालुक्याचे आमदार आणि सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे. काही लोकं विचारतात की तुम्ही पवार साहेबांना का सोडलं? पण शरद पवारांना सोडायचा प्रश्नच येत नाही. करापण बऱ्याच लोकांना आतल्या गोष्टी माहीत नसतात, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत. त्यामुळे आपण शरद पवार यांना सोडत नसल्याचे आमकेतच सायलेंट आहेत.
आंबेगाव तालुक्यात एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी भाषणात हे वक्तव्य केले आहे.
यावेळी दिलीप वळसे पाटील म्हणाले की, ज्यावेळी 54 आमदारांची बैठक झाली, त्यावेळी सरकारामध्ये जाण्याची चर्चा झाली. पण आपण कोणत्या पक्षात गेलो नाही, आपला पक्ष राष्ट्रवादी व चिन्ह घड्याळच आहे. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी सत्तेत जाणं गरजेचं होतं. गेल्या दोन वर्षांत अजितदादा अर्थमंत्री आसल्याने त्यांनी भरभरून पैसा दिला व आपली कामे झाली. राजकरणात अशा गोष्टी कधी कधी घडतात. राजकारणात झालेला बदल हा त्या परिस्थिती प्रमाणे हाताळायचा असतो. याचा अर्थ लगेच आपण साहेबांचे दुश्मन झालो, साहेब आपले दुश्मन झाले असं नाही. त्यांच् बाबत प्रेम व आदर आजही आपल्यात आहे. पण विरोधकांकडे मुद्दे नाहीत, काही भांडवल नाही, बोलायला मुद्दे नाहीत म्हणून ते बोलत असतात.
https://youtu.be/v_7TCa2zm1Y?si=EdSIctMmYaH0FgfG
आज मी मंत्रिमंडळात नसतो तर एवढा निधी आपल्या तालुक्यासाठी आणू शकलो नसतो. माझ्या मतदार संघातील कोणत्याही गावाला जा दोन ते चार कोटी निधी आलाच आहे. कधी मंचरला निधी मिळत नव्हता. आता मंचरला 85 कोटींचा निधी दिला. मतदान होईल तेव्हा होईल, पण आपलं मंचर सुधारलं पाहिजे असे वळसे पाटिल म्हणालेत.