शिरूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पूणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच आमदार शरद पवार यांना सोडून गेले. मात्र शिरूर लोकसभेचे आमदार अशोक पवार हे एकमेव आमदार असे होते त्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले. त्यामुळे त्यांना त्याचा फायदा देखील होणार आहे. येणाऱ्या निवडणुकीत अशोक पवार हे महाविकास आघाडीचे शिरूर विधानसभेचे अधिकृत उमेदवार असणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. मात्र त्यांच्या विरोधात लढण्यासाठी महायुतीत अद्याप उमेदवारच नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे विधासभेअगोदरच अशोक पवारांची चर्चा होऊ लागली आहे.
राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर अशोक पवार यांनी शरद पवार यांच्या सॊबत राहणे पसंत केले. त्या गोष्टीचा त्यांना त्रास देखील सहन करावा लागला. मात्र त्यांनी या त्रासाला न डगमगता ठाम पणे सामना केला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीला खासदार अमोल कोल्हे यांना त्याचा फायदा झाला. मात्र आता विधानसभा निवडणुकीत त्यांना शिरूर विधानसभेसाठी त्यांचं पारड जड असल्याचे पाहायला मिळत आहे.
त्यामुळे येणाऱ्या काळात अशोक पवार यांच्या विरोधात महायुतीकडून कुठला उमेदवार दिला जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण महायुतीकडे अद्याप कुठलाही सक्षम उमेदवार नसल्याचे पहायला मिळत आहे.
Leave a Reply