दिवे घाटात दरड कोसळली….! भला मोठा दगड आला रस्त्यावर

पुणे : पुण्यातील दिवे घाट परिसरा मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिवेघाटात दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. अचानक दरड कोसळल्याने वाहन चालकांची एकच तारांबळ उडाली. दिवे घाटामध्ये काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे चालकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी सायंकाळी साधारण साडेसातच्या सुमारास पुण्यातील दिवे घाटामध्ये एक मोठा दगड अचानक रस्त्यावर येऊन पडला. त्याच्यासोबत मोठा मातीचा ढिगारा देखील रस्त्यावर आला. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना मोठा अडथळा निर्माण झाला होता. काही काळ या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे देखील पाहायला मिळाले. रात्रीची वेळ असल्याने वाहतूक धीमे गतीने होत होती.

सुदैवाने या दरड कोसळल्या मध्ये कोणतीही हानी झालेली नाही. मात्र हा दगड कोसळताना घाटामध्ये जर एखादी गाडी असती तर मोठा अपघात झाला असता. ही दरड कोसळल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर रस्त्यावर आलेला मोठा दगड बाजूला काढण्यात आला. त्यानंतर वाहतूक हळूहळू पोलिसांकडून सुरळीत करण्यात आली.

या घटनेमुळे घाटामध्ये वाहनाच्या लांबच लांब लागल्या होत्या. वाहतूक सुरळीत करताना पोलिसांची चांगली तुमच्या मिळाले. पाऊस नसताना देखील दरड कोसळल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. अशा घटना टाळण्यासाठी डोंगर भागामध्ये प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. अन्यथा मोठी दुर्घटना घडण्यास वेळ लागणार नाही. मोठा मातीचा ढिगारा बाजूला काढण्याचे काम प्रशासनाकडून सुरू असून वाहतूक सुरळीत करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.