चिंचवडचे महायुतीचे उमेदवार राहुल कलाटे विरोधात अदखल पात्र गुन्हा…! वंचित बहूजन आघाडीच्या उमेदवाराला धमकी

पुणे : चिंचवड विधानसभेसाठी महायुतीच्या उमेदवार शंकर जगताप यांच्या विरोधात महाविकास आघाडी कडून राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, काल अर्ज अर्ज भरण्यासाठी निघालेल्या उमेदवाराला तू अर्ज भरला तर तुला पाहून घेईन, अशी दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल तानाजी कलाटे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. कलाटे यांनी संबंधित उमेदवाराचे कागदपत्रे गॅलरीतून खाली देखील फेकून दिली.

जावेद रशीद शेख (वय ३५, रा. आदर्श कॉलनी, वाकड) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जावेद शेख हे वंचित बहूजन आघाडी पक्षातर्फे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघाले होते. ही घटना थेरगाव येथील महापालिकेच्या ग प्रभाग कार्यालयाच्या तिसर्‍या मजल्यावर मंगळवारी (दि.२९) रोजी दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडली आहे.

चिंचवड चिंचवड विधानसभेसाठी माय तिकडून शंकर जगताप यांना उमेदवारी देण्यात आले आहे. मात्र महाविकास आघाडी कडून उशिरा उमेदवार जाहीर करण्यात आला. यासाठी अनेक जण इच्छुक होते. मात्र राहुल कलाटे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. मंगळवारी कलाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी हा प्रकार घडल्याचे शेख यांनी तक्रारीत म्हटले आहे.

सध्या सर्वच मतदारसंघांमध्ये निवडणुकीचा धुराळा आवडत आहे. त्यामुळे अनेक प्रकार घडत आहेत. या प्रकारा संदर्भात राहुल कलाटे यांच्याकडून अद्याप कोणत्याही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र या प्रकरणाची राजकीय चर्चा रंगू लागली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास फौजदार बालाजी मेटे तपास करीत आहेत.