अशोक पवारांच्या सभेअगोदर निषेधाचे फलक, पोलिसांनी शेतकऱ्यांना पोलीस चौकीत बसवले

शिरूर : शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे आमदार अशोक पवार यांच्या प्रचार सभेच्या अगोदर निषेधाचे फलक दाखवणाऱ्या शेतकऱ्यांना पोलीस चौकीत बसवून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांच्या सांगण्यावरून केल्याचा आरोप या शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे.

तळेगाव ढमढेरे येथे अशोक पवार यांची प्रचार सभा होणार होती. मात्र या सभे अगोदर काही शेतकऱ्यांनी ‘ कर्ज सम्राटांच्या करामती…शेळी बाजार गावातून बाहेर काढत बारा बलुते दारांच्या पोटावर पाय देणाऱ्याला मतदान करायचे का ?, ज्यांनी घोड गंगा कारखाना बंद पाडला त्यांना मतदान करायचे का?, पुनर्वसन शेरा कमी करण्याचे हजार दाखवून दोन वेळा आमदार झाला परत आमदार करायचा का ? , आजोबा गेले ,वडील गेले वारसनोंद नाही. स्वतःचा मुलगा सभासद होऊन चेअरमन होतो कसा ?, अशा आशयाचे फलक झळकावले.

त्यामुळे सभा सुरु होण्याअगोदर पोलिसांनी आम्हाला अशोक पवार यांची सभा होईपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवले. अशी माहिती शेतकरी मार्तंड ढमढेरे, सुनील ढमढेरे ,रामभाऊ जगताप, सुधीर ढमढेरे ,विजय घुले, राजू पाटील ढमढेरे, सचिन गुंदेचा,सुधीर ढमढेरे, प्रफुल्ल आल्हाट, दिलीप खैरे यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न टाळण्यासाठी पोलीस बळाचा वापर करत शेतकरी मुलांना थेट पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्याची घटना आमदार अशोक पवारांच्या प्रचार सभेत घडली आहे. तळेगाव ढमढेरे येथे झालेल्या सभेआधी काही शेतकऱ्यांनी अशोक पवारांच्या विरोधात निषेध फलक झळकवल्याने पोलिसांनी त्यांना थेट चौकीत नेऊन बसवले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.