पुण्यात माजी उपसरपंचाची अपहरण करून हत्या….! खडकवासला धरण परिसरात आढळले मृतदेहाचे तुकडे

पुणे : पुण्यातील सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावच्या हद्दीत डोणजे गावचे माजी उपसरपंच विठ्ठल पोळेकर यांची हत्या झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. दोन दिवसांपूर्वी पोळेकर हे सकाळी मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांचे अपहरण देखील झाले होते. मात्र त्यांचा मृतदेह शनिवारी सायंकाळच्या सुमारास विचित्र अवस्थेत सापडला. त्यात त्यांची हत्या झाली असल्याचे समोर आले.

त्यांच्या अपहरण झाल्यानंतर विठ्ठल पोळेकर यांच्या कुटुंबियांनी कुख्यात गुंड बाबू माने याने पोळेकर यांचे अपहरण केल्याची तक्रार दाखल केली होती. त्याच दोन दिवसानंतर खडकवासला धरण परिसरात ओसाडे गावच्या हद्दीत पोळेकर यांच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आले. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, काही दिवासांपूर्वी विठ्ठल पोळेकर यांच्याकडे कुख्यात गुंड बाबू मामे याने दोन कोटी रुपयांची खंडणी मागणीतली होती. मात्र ही मागणी कोळेकर यांच्याकडून पूर्ण झाली नसल्याने त्यांचे अपहरण करून खून झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खडकवासला पोलिसांनी कोळेकर यांच्या हत्येचा तपास सुरु केला. त्यानुसार पोलिसांनी गुंड बांबू मामे आणि विठ्ठल कोळेकर यांच्यात काही कनेक्सन आहे का? या मार्गाने पोलीसांकडून तपास केला जातं आहे.

पुण्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस डोके वर काढत आहे. त्यात ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही हत्या झाल्याने एकाच खळबळ उडाली आहे. यावा घटनेचा पोलिसंकडून विविध अंगाने तपास केला जातं आहे. पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.