मुंबई : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव तालुक्यातील वावे दिवाळी गावच्या हद्दीत चारचाकी गाडीवरी नियंत्रण सुटून गाडी थेट पुलाचा कठडा तोडून 30फूट खोल दरीत जाऊन कोसळली. या अपघातात पती पत्नीचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे.
दशरथ दुदुमकर आणि देवयानी दशरथ दुदुमकर अशी मृत झालेल्या पती पत्नीची नावे आहेत. तर या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुंबई-गोवा महामार्गावर वावे दिवाळी गावच्या हद्दीत सोमवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास महाड बाजूकडून मुंबई बाजूकडे जात असलेली मारुती सुझुकी सेलेरिओ गाडीला भीषण अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने महामार्गावरून पुलाचा कठडा तोडून सुमारे 25 ते 30 फूट खोल नदीत खाली कोसळली. भरधाव येणारी कार नदीवरील पुलाच्या कठड्याला धडकून हा कठडा तुटून खाली नदीत आदळली. त्यावेळी गाडीच्या अपघाताने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात एवढा भीषण होता की गाडीचा पूर्णतः चक्काचूर झाला आहे.
गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पुलाच्या खाली कोसळली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.