पुणे : आपल्या आजूबाजूला अनेक चोरीचे प्रकार घडताना आपण बघतो. चोरी करण्यासाठी चोरटे अनेक युक्त्या वापरताना आपल्याला पहायला मिळतात. मात्र मुळशी तालुक्यात अज्ञात चोरट्यानी अवघ्या 1 मिनिट आणि 28 सेकंदाच्या आत 10 लाख 89 हजार 700 रुपयांची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने सर्वच हादरले आहेत.
याबाबत पौड पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुळशी तालुक्यातील पिरंगूट येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ईटीएम मध्ये हा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे चोरट्यानी कोणतेही एटीएम न फोडता चावीचा वापर करून ही चोरी केली आहे. या प्रकरणी प्रवीण चिमणदास बुटाला यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुळशी तालुक्यातील पिरंगुट गावाच्या हद्दीत असलेल्या पुणे जिल्हा मध्यावर्ती बँकेचे एटीएम आहे. या एटीएममध्ये दोन व्यक्ती पैसे काढण्यासाठी आल्या. त्यांनी आजूबाजूचा कानोसा घेत त्यातील एका व्यक्तीने चावीच्या सहायाने एटीएमचा दरवाजा उघडला. त्यानंतर त्याने एटीएमच्या आतमध्ये ठेवलेल्या लॉकचा पासवार्ड टाकून रोख रक्कम 10 लाख 89 हजार 700 रू ट्रे सह स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी ती रक्कम बॅगेत भरून चोरी करून चोरून नेले.
या प्रकरणी पौड पोलिस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि योगेश जाधव करत आहेत.