हॉटेल चालकाने केला मित्राचा खून….! वेटरला मारहाण झाल्याचे कारण

पुणे : हॉटेल मधील वेटरला मारहाण केल्याच्या रागातून हॉटेल चालकाने झालेल्या वादातून दोघावर त्यांच्याच कोयत्याने वार केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना मावळ तालुक्यातील इंदोरी बायपास जवळ असणाऱ्या हॉटेल जय मल्हार जवळ घडली आहे. या प्रकरणी हॉटेल चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

प्रसाद उर्फ किरण अशोक पवार ( वय 27) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून खून करणारा अक्षय येवले यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. मारहाण करणारे एकमेकांचे मित्र असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, तळेगाव एमआयडीसी हद्दीत असणाऱ्या इंदोरी बायापासलगत असणाऱ्या हॉटेल जय मल्हार येथे मंगळवारी रात्री 9.45 मिनिटांनी प्रसाद पवार आणि त्याचा मित्र अभिषेक येवले हे आले होते. कोणत्यातरी कानरावरून त्यांनी या हॉटेलमधील वेटरला मारहाण केली. या घटनेची माहिती संबंधित वेटरने हॉटेल चालक अक्षय येवले याला दिली. हॉटेल चालक असलेल्या अक्षय यांनी त्याचे मित्र असलेले प्रसाद पवार व अभिषेक येवले यांना भांडणे न करण्याबाबत व आपण हॉटेलच्या ठिकाणी येत असल्याबाबत सांगितले होते. त्यावरून फोनवरच दोघांमध्ये शिवीगाळ झाली होती. त्यानंतर प्रसाद पवार व अभिषेक येवले तेथून निघून गेले. त्यानंतर तर साधारण 11.30 च्या सुमारास प्रसाद पवार व अभिषेक येवले हे कोयता घेऊन हॉटेलजवळ पुन्हा आले. त्यावेळी हॉटेल चालक अक्षय येवले हे हॉटेल बंद करून त्यांची वाट बघत थांबला होता. त्या ठिकाणी हॉटेल चालक अक्षय येवले व त्यांच्यात वादावादी झाली. त्यातच अक्षय येवले याने त्यांच्या हातातील कोयता घेऊन दोघांनाही मारहाण करून गंभीर जखमी केले.

घटनेची माहिती मिळताच रात्रपाळीवर असणारे अधिकारी पोउपनि रेळेकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे व तेथून पवना हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यातील जखमी प्रसाद उर्फ किरण अशोक पवार याचा मृत्यू झाला. दुसरा जखमी झाला आहे. या प्रकरणी आरोपी हॉटेल मालक अक्षय दत्तात्रय येवले यास ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.