महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार मुरलीधर मोहोळ? नंतर स्वतःच दिले स्पष्टीकरण

पुणे : राज्याच्या राजकारणात महायुती सरकार संपूर्ण ताकतीनिशी यश मिळवल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणारा अशी चर्चा सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असताना आता आणखी एका नावाची चर्चा सुरु झाली आहे. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा आता मुख्यमंत्री पदासाठी सुरू झाली आहे. मात्र या,चर्चा निरर्थक असल्याचे स्वतः मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले आहे.

मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा सुरु झाल्याने पुण्याला मुख्यमंत्री पद मिळणार त्यामुळे आनंदी वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

मुरलीधर मोहोळ यांनी पोस्ट मध्ये म्हटले आहे की, समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते देवेंद्रजींच्या नेतृत्वात लढलो. महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला आहे.

https://x.com/mohol_murlidhar/status/1862571924204765609?t=VLVaEWnYaHdPRsAuPnkjGg&s=09

आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो. असे निर्णय पार्लिमेंटरी बोर्डात एकमतावर घेतले जातात, ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर ! आणि पार्लिमेंट्री बोर्डात एकदा का निर्णय झाला, तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो. म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे.