मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, ट्रेलर चालक याचा जागीच मृत्यू

मुंबई : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खैरेवाडी येथे ट्रेलरचा दुभाजकला धडकून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ट्रेलर चालकाचा जागेवर मृत्यू झाला आहे.

पवन शिवाजी जाधव (वय- ३३) असे मृत ट्रेलर चालकाचे नाव असून नागोठणे पोलिस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे.रायगड जिल्ह्यात अपघातासाठी अत्यंत धोकादायक खिंड अशी ओळख असलेल्या सुकेळी खिंडीच्या उतारावरती खैरवाडी स्टॉपच्या समोर ट्रेलर दुभाजकाला धडकुन भीषण अपघात झाला.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच वाकण वाहतूक शाखेचे कर्मचारी यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली व हायड्राच्या सहाय्याने ट्रेलरचालकाला केबिनमधुन बाहेर काढण्यात आले असुन त्यास जिंदाल रुग्णालयाच्या रुग्णवाहीकेतुन नागोठणे सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. या अपघाताचा पुढील तपास नागोठणे पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी करीत आहेत