विधान भवनात चिमुकल्या सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हनुमान चालीसा पठण

नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. विधानसभेत जाण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी ‘वेद’नामक एक चिमुकला विधानभवनात आला होता. त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, तेव्हा त्याने हनुमान चालीसा म्हणून दाखवली, ज्यावेळी तो चुकू लागला, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्याला सांभाळून घेत हनुमान चालीसाचे पठण पूर्ण केला . याचा विडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. देवेन्द्र फडणवीस यांची चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.

https://youtu.be/1wRTqpDXoNw?si=5YPt-2CLZK41qo8Z