पुणे :फरसखाना पोलीस ठाण्यात गु.र.क्र.११८/२०२४, मध्ये आरोपी यश प्रदीप जावळे याच्यावर आरोप होते की फिर्यादी हा यश जावळे मोक्यासारख्या गुन्ह्यातून सुटून देखील फिर्यादी त्याला इज्जत देत नाही आणि त्यामुळे गँग च्या इमेजला धोका निर्माण होत आहे. म्हणून त्याला जिवंत सोडणार नाही म्हणत त्याचे अपहरण करून मंगळवार पेठ पासून कॅम्प कृष्णा नगर वानवडी मोहम्मदवाडी असे मोटरसायकलवर बसून त्याला सूमसान ठिकाणी घेऊन जाऊन केबल वायर, बांबू, पट्ट्याने मारहाण करून नंतर स्वतः ओला कॅब बुक करून दिली आणि त्याच्याकडून जबरदस्ती काढून घेतलेले पैसे देखील परत केले प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
आरोपी यांना अटक करून मोका कार्यवाही करण्यात येऊन सदर प्रकरणाची चर्चा वृत्तपत्रात होती आणि आरोपींना विशेष मोका न्यायाधीश श्री. मे. व्ही. आर. कचरे यांच्या कोर्टात हजर करण्यात आले होते, टोळी प्रमुख आरोपी यश जावळे याने वकील श्री. सुशांत तायडे यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला आणि त्याच्या वतीने सदर गुन्हा खोटा असल्याचा युक्तिवाद करण्यात येऊन संपूर्ण प्रकरण हे बनावट असून सीसीटीव्ही सोबत छेडखानी करण्यात आल्याचे आणि या आधीच हडपसर पोलिस ठाण्याचा पहिला मोका डिस्चार्ज झाल्यामुळे पुन्हा मोका लावण्यासाठी सदर प्रकरणात वाढीव गोष्टींचा उल्लेख करण्यात आल्याचे म्हटले.
सरकार पक्षाने आरोपी यश जावळे हा टोळीप्रमुख असून टोळी निर्माण करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आणि गुन्हेगारी दुनियेत वर्चस्व निर्माण करण्यासाठी गुन्हे करत आहे आणि सदरचा गुन्हा हा त्यातलाच एक प्रकार आहे, प्रथमदर्शनी पुरावे सीसीटीव्ही फुटेज मध्ये सर्व प्रकार दिसून येत असल्याचे म्हणत जोरदार आक्षेप नोंदविला होता आणि सदर जामीन अर्ज नामंजूर करण्याची मागणी केली होती.
विशेष मोका न्यायाधीश कचरे साहेब यांनी प्रकरणाचे सखोल अवलोकन केल्यानंतर आरोपी यश जावळे, कानगुले पवार आणि मसुरे यांचा जामीन मंजूर केला. टोळी प्रमुख यश जावळे याचे आधीच्या हडपसर पोलीस ठाण्यातील मोक्याचे आणि वर्तमान न्यायालयीन कामकाज वकील सुशांत तायडे, प्रज्ञा कांबळे, दिनेश जाधव, जितू जोशी आणि शुभांगी देवकुळे यांनी पाहिले.