पुण्यात दोन ठिकाणी भीषण आगीच्या घटना…! आग विझवताना जवान जखमी

पुणे : पुण्यात दिवसेंदिवस आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. कोंढवा येथील आगे ची घटना ताजी असताना वारजे परिसरात असणाऱ्या दांगट पाटील नगर येथे मंडपाचे साहित्य असलेल्या गोदामास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. तसेच कात्रज परिसरातील मांगडेवाडी परिसरात असणाऱ्या एका प्लाऊडच्या साहित्याला देखील आग लागल्याची घटना समोर आली आहे. या दोन्ही घटनांमुळे पुण्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमध्ये आगविताना अग्निशामक दलाचा एक जवान जखमी झाला आहे.

आज बुधवारी पहाटेच्या सुमारास ही आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही घटनांच्या अग्नी नियंत्रणात आले असून सध्या कॉलिंग चे काम सुरू आहे. मात्र या घटनांमध्ये अग्निशामक दलाचा एक जवान गंभीर जखमी झाला आहे.

अक्षय गायकवाड तो वारजे अग्निशामक केंद्रामध्ये काम करतो. अक्षय गायकवाड याला वारजे परिसरात असणाऱ्या हार्डीकर हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्या हाताच्या उजव्या बाजूला खांद्याला Minor Fracture आहे व इतर किरकोळ दुखापत झाली आहे.