माझा पत्ता कट करण्याऐवढी अजित पवारांची ताकत नाही, विजय शिवतारे यांचा हल्लाबोल 

पुणे : मंत्री मंडळाचा विस्तार झाल्यानंतर पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाही. त्यानंतर शिवतारे यांनी वरिष्ठ नेत्यांवर आगपाखड केली. आम्ही नेत्यांचे गुलाम नाही असे म्हणतं त्यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनातून आपल्या मतदार संघात हजेरी लावली होती. यानंतर विजय शिवतारे यांनी आपली भूमिका पुन्हा एका स्पष्ट केली आहे. त्यांनी अजितदादा पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मंत्री मंडळातून माझा पत्ता कट करावा एवढी अजित पवारांची ताकत नाही, अशी टीका विजय शिवतारे यांनी केली आहे.

पुरंदर तालुक्यातील विविध कार्यक्रमांना विजय शिवतारे यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही टिका केली आहे.

पत्रकारांनी शिवतारे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की, तुमचा मंत्रिमंडळातून पत्ता कट करण्यात अजित पवारांचा हात आहे का? त्यावर विजय शिवतारे यांनी माझा पत्ता कट करण्याऐवढी अजित पवारांची ताकद नाही. आमचे नेते एकनाथ शिंदे असे कोणाचे ऐकून निर्णय घेत नाहीत, असं विजय शिवतारे म्हणाले. तसेच अनेक जण वाईटावर असताना आम्ही २७ हजारांचे मताधिक्य मिळवले आहे, असा टोलाही विजय शिवतारे यांनी लगावला आहे.