मुंबई : मुंबईतील गेट ऑफ इंडिया जवळ असणारी गेट ते एलिफंटा दरम्यान जलवाहतुक सुरु करण्यात आली आहे. त्यातच आता एका धक्कादायक घटना समोर आली आहे.
मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाला जाणारी एक प्रवाशी बोट बुडाल्याची घटना समोर आली आहे. स्पीड बोट प्रवाशांना समुद्रातून घेऊन जातं असताना त्या स्पीड बोटने प्रवाशी बोटला जोरात धडक दिली. यानंतर मुंबई पोलीस आणि भारतीय नौदल यांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे.
त्यामध्ये 30 ते 35 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून ही बोट मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावरून सुटली अन् एलिफंटाला जात होती. एलिफंटा येथे जाणारी नीलकमल नावाची फेरीबोट उरण, कारंजा येथे बुडाली असल्याची प्राथमिक माहिती आहे. यात तीन जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून अन्य प्रवाशांचा शोध घेतला जात आहे.या ठिकाणी स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे.