पुणे : उत्तर पुणे जिल्हा हा बिबट्यांचे अगर म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. दिवसाढवळ्या देखील या भागामध्ये बिबट्याचे दर्शन होत आहे. बिबट्या मानवी वस्तीचे वाटचाल करू लागला असून मनोहर देखील त्याने हल्ली करणे सुरू केले आहे. असे असताना एक वाईट बातमी समोर आली आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वर्धा वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला आहे.
मुबई पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी एका भरधाव वाहनाने एका बिबट्याला धडक दिली. या धडकेत बिबट्याचा जागेवरच मृत्यू झाला आहे. हा बिबट्या पूर्ण वाढ झालेला असून आपल्या भक्षकाच्या शोधार्थ तो रस्त्यावर आला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे.
जुन्नर,आंबेगाव,शिरूर,खेड या तालुक्यांमध्ये बिबट्याची साम्राज्य पाहायला मिळत आहे. या भागामध्ये वाहनांवरून जाणे देखील भीतीदायक झाले आहे. या भागातील अनेक नागरिकांवर हल्ले केले असून यात काहींना आपले प्राण देखील गमावे लागले आहेत. मात्र या बिबट्याचा मृत्यू झाल्याने प्राणी मित्रांनो हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.