‘मी थांबतोय’ असं म्हणत आर. अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती


मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज आर. अश्विन याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना अचानक आंतराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
भारत – ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसरा कसोटी सामना ब्रिसबेन येथे खेळवण्यात आला होता. हा सामना ड्रॉ झाला. त्यानंतर कर्णधार रोहीत शर्मा याच्या उपस्थितीत आर. आश्विन याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे.

*आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी*

अश्विननं भारताकडून एकूण २८७ सामने खेळले आहेत. यात १०६ कसोटी सामन्यातील २०० डावात त्यानं ५३७ विकेट्स घेतल्या आहेत. यात ३७ वेळा त्याने पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्याशिवाय त्याने आठ वेळा १० विकेट्स देखिल आहेत. तसेच ५९ धावा खर्च करून ७ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तसेच ११६ वनडेत त्याने १५६ विकेट्स घेतल्या आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये ६५ सामन्यात त्याच्या खात्यात ७२ विकेट्स घेण्याची कामगिरी त्याच्या नावावर आहे.