छगन भुजबळ अजितदादांना सोडणार? चर्चाना आले उधाण

नाशिक : मंत्रिमंडळ विस्तार पार पड्ल्यानंतर अनेक दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित]पवार गटाचे नेते ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे देखील होते. याबाबत भुजबळ यांनी थेट बोलण्यास सुरूवात केली आहे. वारे रे दादाचा वादा ,कसला वाद अन कसला
दादा , असे म्हणत छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्यावर हल्लबोल केला आहे. अजितपवार यांच्यावर टीका करत कार्यकर्त्यांसमोर आपल्या कार्याचा लेखाजोखाच मांडला आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशन सोडून छगन भुजबळ थेट आपल्या मतदार सांघात दाखल झाले. त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

यावेळी भुजबळ म्हणाले कि, आठ दिवसांपूर्वी समीर भुजबळ यांना पटेल, तटकरे यांनी बोलवले. त्यानंतर मकरंद पाटील यांचे भाऊ नितीन पाटील यांचा राजीनामा घेवून छगन भुजबळ साहेबांना राज्यसभेवर पाठवू, अशी चर्चा झाली होती. मकरंद पाटील यांना मंत्रिपद द्यायचे अन् त्याच्या भावाला खाली बोलवायचे. हा काय पोरखेळ आहे का? लोकांनी मला निवडून दिले आहे, त्यांना मी काय तोंड देवू. छगन भुजबळ काय लहान बाळ आहे का ? तुम्ही पाहिजे तसे त्याचा वाप करून घेणार ? माझ्या मनात मंत्री पदाची शंका होती, अन् त्याप्रमाणे झाले आहे. माझी जर किंमत होत नसेल तर काय उपयोग? असं म्हणत छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याची तयारी छगन भुजबळ यांच्याकडून करण्यात येत असल्याच्या चर्चा आता सुरु झाल्या आहेत.

मला सोनिया गांधी मुख्यमंत्री करणार होत्या ?

ज्यावेळी शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले, त्यावेळी मी काँग्रेससोबत राहीलो होतो. मला मुख्यमंत्री पदाची ऑफर मिळाली होती. त्यावेळी कोणाचाच पत्ता नव्हता, मी आणि शरद पवार आम्ही दोघेच होतो. शरद पवारांनी मला उपमुख्यमंत्रीपद दिले, गृहमंत्री बनवले. ‘टाडा’ त्यावेळी जोरात होता, मी गृहमंत्री झालो. दाऊदचे कोणी नाव घेत नव्हते, छगन भुजबळ यांनी त्याचे नाव गृहमंत्रीपदी असताना घेतले होते, असं देखील भुजबळ यांनी सांगितले आहे.
मुस्लिम माणसाचा पेहराव करून गोव्याला गेलो