पुण्यात महिलेचा रुद्रावतार, छेड काढणाऱ्या दारुड्याला चोपला, video आला समोर

पुणे : पुणे शहरात महिलांबाबतच्या अनेक घटना समोर येत आहेत. मात्र एसटी बसमध्ये एक दारूडा एका महिलेची छेड काढत होता, त्या महिलेने संबंधित दारूड्याला चांगला चोप दिल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलं झाल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

पुणे येथे एसटी बसमध्ये शिर्डी येथील एका शाळेत स्पोर्ट टीचर म्हणून कार्यरत असलेल्या प्रिया लष्करे या आपल्या पती व मुला सहप्रवास करत होत्या. त्यावेळी या बसमध्ये मद्यधुंद अवस्थेत एक व्यक्ती बसलेला होता. त्या व्यक्तीने तिच्या सॊबत असलेल्या एका व्यक्तीने संबंधित महिलेची छेड काढली. त्यानंतर महिलेने या दारुड्याला आपला रुद्रावतार दाखवला. एकामागे एक कानाखाली मारत संबंधित महिलेने केलेल्या कृतिबद्दल जाब विचाराला. त्यानंतर एसटी कंडक्टरने देखील त्याला चांगला चोप देत गाडी पोलीस चौकीला नेण्यात आली.

पोलीस चौकीला गेल्यानंतर पोलीस चौकीत एकही पोलिस हजर नव्हता. संबंधित महिलेने त्या दारुड्याला पोलीस चौकीत ठेवले. हा सर्व प्रकार पुण्यासारख्या शहरात घडला. मात्र या महिलेच्या मदतीला एकही महिला समोर आली नाही. एसटी पोलीस चौकीत गेल्यानंतर बासमधील महिला दुसऱ्या बसमध्ये निघून गेल्या.

याबाबत प्रिया यांनी नाराजी व्यक्त केली असून आजच्या प्रकारत खर तर बसमधील महिलांनी एकत्र येणं गरजेचं होत. आज हा प्रकार माझ्यासोबत घडला, उद्या हा कुणासोबतही घडू शकतो. महिलांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.