संतोष देशमुख हत्येतील मुख्य आरोपीचे एन्काऊंटर करणाऱ्यांना 51 लाखांचे बक्षीस, माढ्यातील शेतकऱ्याची घोषणा

सोलापूर : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण देशभर गाजत असताना सोलापूर जिल्ह्याच्या माढ्यातील एका शेतकऱ्याने सरपंचाची हत्या करणाऱ्या आरोपिंचे एनकाउंटर करणाऱ्यांना 51 लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. या घोषणा करणाऱ्या शेतकऱ्याची चांगलीच चर्चा सुरु झाली आहे.

माढ्यातील शेतकरी कल्याण बाबर असे घोषणा करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव असून त्यानुसार स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र तयार करून ही घोषणा केली आहे. हे प्रतिज्ञापत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवणार असल्याचेही कल्याण बाबर यांनी जाहीर केले आहे.

शेतकऱ्याची अनोखी घोषणा https://youtube.com/shorts/i48ggozXyHs?si=KRI5xienMsLzFzi9

या आगळ्या वेगळ्या घोषणेमुळे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील शेतकरी कल्याण बाबर यांची चर्चा सुरु झाली आहे.