पुणे : पुण्यातल्या कर्वेनगर येथे एका नामांकित शाळलेत नृत्य शिक्षकाने अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. शाळेतल्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करताना हा प्रकार समोर आला आहे. जेव्हा याबाबत कुटुंबियाना समजले तेव्हा त्यांनी वारजे पोलीस स्टेशनला धाव घेत नृत्य शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसानी याची गंभीर दखल घेत त्या शिक्षकाला अटक केली असून, पुढील तपासात संस्थाचालकालाही अटक करण्यात आली आहे.
अन्वित पाठक असं या संस्था चालकाचा नाव आहे. तर नृत्य शिक्षक मंगेश साळवे याला पोलिसांनी पूर्वीच अटक केली आहे. आता पर्यंत यांच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. मंगेश साळवे याला २२ डिसेंम्बर पर्यंत पोलोस कोठडी सुनावण्यात अली आहे.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुण्यातील कर्वेनगर परिसरात एका शाळेत आरोपी मंगेश साळवे हा नृत्य शिक्षक म्हणून कार्यरत आहे. नृत्य शिकवत असताना आरोपी शिक्षक मंगेश साळवे हा शालेय विद्यार्थ्यांना अश्लील विडिओ दाखवत त्यांच्यावर लैगिक अत्याचार करत होता. एका 11 वर्षीय विद्यार्थ्यानं त्याच्याबाबत घडलेला प्रकार समुपदेशन सुरू असताना सांगितला. तब्बल दोन वर्षे हा सर्व प्रकार सुरू होता. त्यानंतर त्याच्या आई वडिलांना देखील याबाबतची माहिती दिली. त्यामुळे त्याच्या आई वडिलांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली.
या घटनेबाबत माहिती देताना झोन ३ चे पोलीस उपायुक्त संभाजी कदम म्हणले की, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत नृत्यशिक्षकाला कालच अटक केली होती. या घटनेत निष्काळजीपणा दाखविल्याने संस्थाचालक अन्वित पाठक याला देखील अटक केली आहे. या घटनेला अनुसवरून आणखी काही घडला आहे. याचा ही तपास सुरू आहे.