पुण्यात कोयता गॅंगची दहशत, गाड्या फोडल्या, नागरिकांत दहशत

पुणे : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी डोके वर काढू लागली आहे. दिवसेंदिवस खून , चोरी ,दरोडा अशा अनेक घटना पुण्यासारख्या मेट्रो शहरात घडत आहेत. त्यात पुन्हा एकदा पुण्याच्या पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत कोयता गॅंगने  आज पहाटेच्या सुमारास गाड्या फोडल्याची घटना समोर आली आहे. पूर्व वैमनस्यातून या गाड्या फोडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

कोयता गँगची दहशत दिवसेंदीवस वाढताना पाहायला मिळत आहे. पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत हा प्रकार घडला असून याबाबत पोलिसांकडून कारवाई करण्याचे काम सुरु झाले आहे. या प्रकारामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.