पुणे: पुण्यातील वाघोली येथील केसनंद जवळ फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना भरधाव डंपरने चिरडले असल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत तिघांचा जागेवर मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती अमेर आली आहे. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे.
विशाल विनोद पवार वय 22 वर्ष, रा. अमरावती मूळ जिल्हा, वैभवी रितेश पवार वय 1 वर्ष , वैभव रितेश पवार वय 2 वर्ष अशी मृत व्यक्तींची दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. तर सहा जण जखमी आहेत. जखमींना ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हे सर्व कामगार आहेत. डांपर चालक हा मदयधुंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. मृत्तांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. तर जानकी दिनेश पवार, 21 वर्षे , रिनिशा विनोद पवार 18 , रोशन शशादू भोसले, 9 वर्षे ,नगेश निवृत्ती पवार, वय 27 वर्षे, दर्शन संजय वैराळ, वय 18,आलिशा विनोद पवार, वय 47 वर्षे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी वाघोली पोलिसांनी डंपर चालक गजानन शंकर तोट्रे, 26 वर्षे रा. नांदेड याला ताब्यात घेतले आहे.
याबाबात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, रविवारी माध्यरात्री कामगार कामासाठी अमराती येथून कामानिमित्त वाघोली येथे आले होते. रात्री उशीर झाल्याने 12 जण फुटपाथवर झोपले होते. तर काही जण फुटपाथच्या बाजूला झोपले होते. मध्यरात्री साधारण 12.30च्या सुमारस मदयधुंद अवस्थेत असलेला डम्पर चालक वेगात आला आणि फुटपाथवर झोपलेल्या कामगारांच्या अंगावर गेला. यात तिघांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून कारवाई कारण्याचे काम सुरू आहे.