पुणे : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी डोकेवर काढत आहे. पुन्हा एकदा गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. वाघोली परिसरात वाघोलीतील बायफ रोडवर असलेल्या सातव यांच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. आज पहाटे साडेचारच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने फायरिंग केल्याचे स मोर आले आहे. गोळीबावरनंतर घटनस्थळावर पुंगळी आढळून आली आहे.
सातव हे वडजाई वस्ती आव्हाळवाडी रोडवर असलेल्या बाईफ रोडवर राहतात. पहाटे आलेल्या अज्ञातंकडून त्यांच्या घरावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आले आहे. या गोळीबारात निलेश सातव यांच्या घराच्या काचा फुटल्या असून यात सुदैवाने जखमी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबाराचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.