छत्रपती संभाजीनगर : आजच्या तरुण पिढीला पैसे कमवण्यासाठी कष्ट ना करता सोप्या पद्धतीने पैसे कसे कमावता येतील याकडे त्यांचा कल असतो. त्यामुळे ते पैसे कमावण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची तयारी असते. त्यामुळे अनेक घटना समोर येत आहेत. त्यातच एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका कंत्राटी कर्मचाऱ्याला अवघा १३ हजार रुपये असूनही त्या बहाद्दराने आपल्या मैत्रिणीला चक्क ४ बीएच के फ्लॅट गिफ्ट केला आहे. तर स्वतःसाठी डायमंडचा चष्मा वापरला आणि बीएमडब्ल्यू सारखी गाडी वापरली असल्याचे देखील समोर आले आहे.
छत्रपती संभाजीनगर परिसरात हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून झोलझाल केला आहे. या दोघांनी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुल प्रशासनाला 21कोटी 59 लाख 38 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. हर्षकुमार अनिल क्षीरसागर असे मुख्य आरोपीचे नाव असून तो सध्या फरार आहे.
बँकेत दिला स्वतःचा मोबाईल नंबर
याबाबत समोर आलेली माहिती अशी कि, क्रीडा संकुलासाठी शासनाकडून मिळणारा निधी जमा होण्यासाठी क्रीडा संकुलाच्या नावाने इंडियन या बँकेमध्ये खाते उघडण्यात आले होते. याबतचा संपूर्ण व्यवहार क्रीडा उपसंचालकांच्या सहीने धनादेशाद्वारे केला जातो. मात्र याबाबत त्या ठिकाणी कंत्राटी कामगार म्हणून काम करत असलेल्या हर्षकुमार क्षीरसागर आणि यशोदा शेट्टी आणि तिचा नवरा यांनी संदर्भात बनावट कागदपत्रे तयार करून ती बँकेला दिली. याशिवाय स्वतःचा मोबाईल नंबर हा इंटरनेट बँकिंग साठी ऍक्टिव्हेट करून त्यावरून ही रक्कम स्वतःच्या खात्यावर वळवून घेतली. एवढे सगळे घडून हा प्रकार सहा महिने झालल्यानंतर लक्षात आला.
कंत्राटी कामगाराने काय केले ?
हा घोटाळा करण्यासाठी क्षीरसागर याने उपसंचालक यांचे नाव आणि बनावट मजकूराचे पत्र वापरल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार क्षीरसागर आणि शेट्टी यांच्या खात्यात 59 कोटींची रक्कम आली. नोंदी, पावती बुक लिहिणे, बँकेची पत्रव्यवहार करणे असे काम क्षीरसागर आणि शेट्टी करत होते. 2023 पासून त्यांच्या खात्यात जवळपास 59 कोटी सात लाख 82 हजार रुपयांचा निधी आला. डल्ला मारलेल्या या पैशांमध्ये मुख्य आरोपी हर्ष कुमार शिरसागर याने आपल्या मैत्रिणीला आलिशान फोर बीएचके फ्लॅट गिफ्ट केला. तर, डायमंडचा चष्मा वापरला आणि बीएमडब्ल्यू सारखी गाडी वापरल्याचे समोर आले आहे.