पुण्यातील पोलिस उपायुक्तांची माणुसकी, रस्त्यावर फिट येऊन पडलेल्या तरुणाचे वाचवले प्राण

 

पुणे : राज्यात पोलिसांबाबत नेहमी चांगले वाईट गोष्टी ऐकायला मिळतात. मात्र पोलीस हे संवेदनशील देखील असतात. पुण्यातून अशीच पोलिसांचे कौतुक करणारी घटना समोर आली आहे. अपघातनंतर रस्त्यावर फिट येऊन पडलेल्या तरुणाचे पुणे शहर पोलीस दलातील पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी एका तरुणाचे प्राण वाचवले आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्तानी दाखवलेल्या माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पुण्यातल्या वानवडी परिसरत असणाऱ्या जगताप चौकात कारने एका दुचाकीस्वाराला उडवले. त्यानंतर तो दुचाकीस्वार रस्त्यावर फिट आलेल्या अवस्थेत पडला होता.त्याचवेळी कामानिमित्त त्याच रस्त्याने जाणारे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांना हा प्रकार दिसला. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत त्यांनी आपल्या वैद्यकीय कलेचा अवलंब करून तरुणाचे प्राण वाचवले.

पोलीस अधिकाऱ्याच्या माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांचीच चर्चा सर्वत्र होत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरलं झाला आहे.