ब्रेकिंग..!सतीश वाघ हत्याप्रकरणात धक्कादायक ट्विस्ट, पत्नीनेच दिली हत्येची सुपारी, प्रेमसंबंधातून घडली घटना

पुणे : काही दिवसापूर्वी एका हत्येने पुणे हदराले होते. भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाची हत्या अपहरण करून करण्यात आली. मात्र आता या घटनेत मोठा ट्वि्स्ट आला आहे. टिळेकर यांच्या मामाची हत्या त्यांच्या मामीने म्हणजे सतीश वाघ याच्या पत्नीनेच केली असल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून पत्नीला अटक करण्यात आले आहे.

9 डिसेंबरच्या सकाळी पहाटे साडेसहाच्या सुमारस मॉर्निंग वॉक ला जाताना त्यांचे अपहरण झाले होते. सतीश वाघ यांचं अपहरण आणि हत्या ही वैयक्तिक करणातून ही घटना घडल्याचे समोर आले होते. मात्र हेत्येचे नेमके कारण सापडत नव्हते. अखेर दीड दिवसांच्या कालावधीनंतर हत्येचे खरे कारण समोर आले असून प्रेम प्रकरणातून सुपारी देऊन खून केल्याच उघड झाले. सतिश वाघ यांच्या पत्नीनेच ही हत्या केल्याचे उघड झाले आहे.

सतीश वाघ यांची हत्या करण्यासाठी पाच लाखांची सुपारी देण्यात आली होती. वाघ यांच्या शेजारी राहत असलेल्या व्यक्तीने हे सर्व कृत्य केल्याचे पोलीस तपासात समोर आलं होते. याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक करण्यात आले आहे.