रक्षकचं बनला भक्षक, लोणावळ्याच्या पोलिसाचे चिमुकलीसोबत अश्लील चाळे

पुणे : मावळ तालुक्यातील विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला रक्षकचं भक्षक बनला. एका पोलीस शिपायाने चिमुकलीसोबत अश्लील चाळे केल्याचे समोर आले आहे. कर्तव्यावर असताना हा पोलीस कर्मचारी दारूच्या नशेत होता. याचं नशेत त्याने पाच वर्षीय चिमुरडीसोबत अश्लील चाळे केल्याचे पुढे आले आहे.

या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सचिन सस्ते असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

नेमक काय घडल?

याबाबत अधिक माहिती अशी की, नाताळची सुट्टी असल्यानं पर्यटक विसापूर किल्ल्यावर गर्दी करत होते. म्हणून नराधम पोलीस सस्ते तिथं बंदोबस्तावर होता. तिथल्याच एका हॉटेलमधून भाकरी घेतली अन त्याने जेवण केलं. त्याच भाकरीचे बिल द्यायला तो हॉटेलमध्ये आला. तेंव्हा मात्र तो दारूच्या नशेत होता. त्यावेळी तिथं पाच वर्षीय चिमुरडीला सस्तेने पाहिले. लघुशंकेचा बहाणा करून तो हॉटेलच्या मागे गेला अन चिमुकलीसोबत अश्लील चाळे केले. मुलीने विरोध केल्याने तुला चॉकलेट देतो हे कोणाला सांगू नकोस, असं तो तिला म्हणाला. मात्र घडला प्रकार मुलीने आईला सांगितला अन या नराधम पोलीस रस्तेचं बिंग फुटले. ज्या लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तो कार्यरत होता, त्याचं पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकारांमुळे पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.