Breking…!भंगार दुकानात टाकीचा स्फ़ोट, चार जण जखमी, एकाची प्रकृती गंभीर

पुणे : पुण्यातील बी टी कवडे रोडवर असणाऱ्या एका भंगारच्यादु कानात स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यात चार जण जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.

महंमद शेख अंदाजे वय ५०, किशोर साळवे – अंदाजे वय ४० (जखमी), दिलीप मिसाळ – अंदाजे वय ४० (जखमी), महंमद सय्यद – अंदाजे वय ५० (जखमी ) अशी जखमीची नावे आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आज सायंकाळी 5.30 मिनिटांच्या सुमारास बी टी कवडे रस्त्यावर असणाऱ्या एका भंगारच्या दुकानात एका टाकीचा स्फ़ोट झाला आहे. यात चार जण जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. भंगार मालाचा साठा असलेल्या मोकळ्या जागेत हि घटना घडली आहे.

अगमिशमक दलाची मदत पोहोचण्यापुर्वी ३ जखमी कामगारांना ( दोन ससून व एक स्थानिक रुग्णालय ) रुग्णालयात रवाना केले असून एक कामगार अत्यंत गंभीर जखमी असल्याचे दिसून आले आहे. अधिक माहिती घेतली असता, चार ही कामगार काम करीत असताना सिलेंडर सदृश टाकी फोडण्याचे काम सुरु असताना मोठा स्फोट झाल्याचे प्राथमिक माहिती अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनावणे यांनी दिली आहे.