सतीश वाघ हत्या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम पोलिसांनी आणला समोर

पुणे : सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात त्यांची पत्नी मोहिनी वाघ यांनीच या हत्येचा कट रचला माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. मोहिनी वाघ हिचे या खुनातील मुख्य आरोपी आणि त्यांच्या मुलाचा मित्र असलेल्या अक्षय जवळकर याच्याशी अनैतिक संबंध होते. त्यातूनच ही हत्या झाल्याचे तपासात समोर आले आहे. सहा महिन्यांपूर्वीच तिने आपल्या पाटील यांना मारण्याचा प्लन केला होता. आपल्या परिचयातील एका व्यक्तीला सतीशला संपवण्यासाठी विचारणा देखील केली होती. अशी माहिती समोर आली आहे.

*कसा होता सतीश वाघ हत्याकांडाचा घटनाक्रम*

9 डिसेंबर 2024

सकाळी 6:30: सतीश वाघ मॉर्निंग वॉक गेले त्यावेळी त्यांचे अपहरण करण्यात आले.

सकाळी 7:00: एका प्रत्यक्षदर्शीने ही घटना पाहून वाघ यांच्या कुटुंबाला कळवले.

सकाळी 8:30: हडपसर पोलिस ठाण्यात अपहरणाची नोंद करण्यात आली.

सकाळी 9:00: गुन्हे शाखेचे पथकही तपासासाठी पाचारण करण्यात आले.

दुपारी 12:00: सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाइल टॉवर लोकेशनच्या मदतीने पोलिसांनी तपास केला

सायंकाळी 6:00: शिंदवणे घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला.

रात्री 8:00: फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी नेला.

*यादरम्यान सतीश वाघ याचे अपहरण केल्यानंतर वाघ यांच्या अंगावर 72 चाकूचे वार केले. मारेकरी एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी सतीश वाघ यांचे गुप्तांग देखील कापले*

11 डिसेंबर 2024

संशयितांची चौकशी: पोलिसांनी 10 संशयितांना ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली.

24 डिसेंबर 2024

मुख्य आरोपी अटक: सतीश वाघ यांच्याकडे 2001 ते 2016 दरम्यान राहत असलेला भाडेकरू अक्षय जवळकर याला धाराशिवमधून अटक करण्यात आली.

25 डिसेंबर 2024

उलट तपासणीदरम्यान सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ हिने पतीच्या हत्येचे कटकारस्थान रचल्याचे समोर आले. तपासात मोहिनी वाघ यांनी गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिली. अक्षय जवळकर याने देखील याची कबुली दिली.