पुणे : विद्येच्या माहेर घरात नक्की चाललय तरी काय? असं म्हणण्याची वेळ आली आहे. शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. त्या घटनेने सर्वजण हादरले आहेत. 27 वर्षांच्या शिक्षिकेने 17 वर्षच्या अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत गैरकृत्य केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यतील एका नामांकित इंग्रजी शाळेत हा प्रकार घडला आहे.
या प्रकरणी खडक पोलिसात संबंधित विद्यार्थ्याच्या आईने याबाबत तक्रार दिली असून संबंधित शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पीडित अल्पवयीन विद्यार्थी हा दहावीच्या वर्गात शिकत आहे. संबंधित शिक्षिका ही याच नामंकित शाळेत अध्यापणाचे काम करतात. 27 डिसेंबर रोजी विद्यार्थी सराव परीक्षा देण्यासाठी शाळेत आला होता. त्यावेळी या शिक्षिकेने विद्यार्थ्याला गळ घातली. त्याला आपल्यासोबत शरीर संबंध प्रस्थापीत करण्यासाठी उत्तेजित केले. तिच्या अशा वागण्याने विद्यार्थी उत्तेजित झाला. त्यानंतर शिक्षिकेने त्याला स्टाफरुम मध्ये नेले. तिथेच त्याच्यावर आत्याचार केले. याबाबात शाळेच्या मुख्याध्यापिकेला माहिती मिळाली. मुख्याध्यापिका स्टाफरूममध्ये आल्यानंतर त्यांना दोघेही नको त्या अवस्थेत पाहायला मिळाले.याबाबत मुख्याद्यापीकेने संबंधित मुलाच्या पालकांना शाळेत बोलावून घेतले. संपूर्ण माहिती घेतल्यानंतर मुलाच्या आईने पोलिसात शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसानी गुन्हा दाखल करून शिक्षिकेला अटक केली. त्यानंतर शिक्षिकेने आपणच त्याच्या सोबत शरीर संबंध प्रस्थापित केल्याची कबुली दिली. शाळेकडून देखील तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे.