Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

खंडोबाचे दर्शनापूर्वीच काळाचा घाला…! भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, 10 जण जखमी

पुणे : जेजुरी येथे खंडोबाच्या दर्शनासाठी निघालेलता पिल्लू अप आणि आयशर गाडीचा बेलसर – वाघापूर रस्त्यावर आज मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर १० पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जरेवाडी येथून सर्व भाविक जेजुरीला खंडोबा देवाच्या दर्शनासाठी निघाले होते. मात्र आज मध्यरात्री देवदर्शना पूर्वीच अडीच वाजता हा अपघात झाला.

या अपघातात पिकअप या गाडीतील जितेंद्र तोतरे, आशाबाई जरे या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर या अपघातात १० पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर जेजुरी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »