पुणे : मावळ तालुक्यातल्या लोणावळ्यातील एकवीरा गडावर आज हुल्लडबाज भाविकांनी मंदिराजवळ कलर धुराचे फटाके लावल्यामुळे मधमाश्यांच्या पोळाला इजा पोहचताच मधमाश्यांनी भविकांनवर हल्लाबोल करत चावा घेतला. यात 50 हुन अधिक भाविक जखमी झाले आहेत. या घटनेमुळे भाविकांची चांगलीच पळापळ झाली तर बहुतेक भाविकांना मध्यमाश्यानी चावा घेऊन जखमी केले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुंबईच्या कुलाबा येथून देवीची पालखी आली होती. त्या पालखीतल्या काही भक्तांनी रंगाचे फटाके वाजविले. मात्र या फटाक्याच्या धुराने शेजारी असलेल्या झाडांवर बसलेल्या मधमाशा उठल्या. त्यामुळे गडावर असलेल्या भक्तांवर त्यांनी हल्ला करण्यास सुरुवात केली. त्यामुळे गडावर एकच पळापळ सुरु झाली. मधमाशानी भाविकावर हल्ला चढवला. यात भाविक जखमी झाले आहेत.
गडावर फटाके वाजविण्यावर बंदी असताना ही काही भाविक याकडे दुर्लक्ष करतात एकविरा गडावर फटाका बंदी कायम असावी अशी मागणी कार्ला एकविरा ग्रामस्थ अशोक कुटे यांनी केली आहे.