पुणे : राज्यात महायुतीचे सरकार आल्याने प्रशासनात मोठे फेरबदल केले जातं आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे हे पूजा खेडकर प्रकरणामुळे चांगलेच चर्चेत आले होते. संपूर्ण राज्यात त्याची चर्चा झाली होती. मात्र आता पुण्याचे जिल्हाधिकारी असलेले डॉ. सुहास दिवसे यांची आता बदली करण्यात आली आहे. त्यांना आता जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख, पुणे या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या जागी आता पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून जितेंद्र डुडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डुडी हे या अगोदर सातारचे जिल्हाधिकारी होते.
*जितेंद्र डुडी यांचा कार्यकाल*
जितेंद्र डुडी हे मूळचे राजस्थानमधील जयपूर या ठिकाणचे असून ते 2016 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी आपाल्या प्रशासकीय कामाची सुरुवात झारखंडमधून केली. तसेच त्यांनी केंद्र शासनात सहाय्यक सचिव म्हणूनही त्यांनी काम केले आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे प्रांतधिकारी म्हणून काम पाहिले असून 2018 मध्ये त्यांची महाराष्ट्र केडरमध्ये नियुक्ती झाली.