पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षाचालकाने संपवले जीवन…! आत्महत्या करण्यापूर्वी केला video शेअर

पुणे : पिंपरी चिंचवड शहरात आत्महत्या करण्यापूर्वी एका ऑटो रिक्षा चालक तरुणाने एक व्हिडियो तयार करून तो व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

मला मानसिक आणि आर्थिक त्रास देणाऱ्या बेकायदेशीर सावकाराच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय घेत आहे, मला माफ करा. असं भावनिक आवाहन करत *राजू नारायण राजभर* या तरुणाने चिंचवड येथील साईनगर भागातील आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे.

*सावकरांचा जाच*

रजनी सिंग, राजीव कुमार उर्फ गुड्डू भैया, महादेव फुले आणि हनुमंत गुंडे उर्फ अविनाश गुंडे या चार बेकायदेशीर सावकाराच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय घेत आहे. असा व्हिडिओ तयार करत आणि सुसाईड नोट लिहत राजू राजभर या तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे.

*मला इलेक्ट्रॉनिक भट्टीमध्ये जाळण्याचे आवाहन*

माझ्या छोट्या मुलीला सांभाळा, माझ्या अंत्यसंस्कारासाठी माझ्या पत्नीकडे पैसे नसल्याने मला इलेक्ट्रॉनिक भट्टीमध्ये जाळा असं अत्यंत भावनिक आवाहन देखील राजू राजभर या तरुणाने केला आहे. आता या प्रकरणात निगडी पोलिसांनी रजनी सिंग, राजीव कुमार, महादेव फुले आणि हनुमंत गुंडे या चार आरोपींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने चिखली परिसरात शोककळा पसरली आहे. पुन्हा एकदा सावकारकीचा बळी गेल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.