पुणे शहरात वाहतूक बदल, तात्पुरते आदेश जारी

पुणे : गणेशखिंड रोडवरील पुणे विद्यापीठ चौक ते शिवाजीनगर न्यायालयादरम्यान टाटा मेट्रोचे काम सुरू असून वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता वाहतूकीत तात्पुरत्या स्वरुपात बदलाबाबतचे आदेश पुणे शहर वाहतूक शाखेचे उप आयुक्त अमोल झेंडे यांनी जारी केले आहे.
बाणेर कडुन शिवाजीनगर कडे जाणारी वाहतुक :- बाणेरकडून येणारी वाहतुक औध रोडवर वळवून राजभवन समोरील पंक्चर मधून युटर्न घेवून पुन्हा विद्यापीठ मार्गे शिवाजीनगर इच्छितस्थळी जातील.

*शिवाजीनगरकडून औंध कडे जाणारी वाहतुक:- शिवाजीनगरकडून औंधकडे जाणारी वाहतूक ही पुणे विद्यापीठ चौकातून सरळ औंधरोड मार्गे इच्छितस्थळी जातील.

*औंधकडून शिवाजीनगर कडे जाणारी वाहतुक:- औंधकडून शिवाजीनगरकडे जाणारी वाहतुक ही मिलेनियम गेट चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या गेटमधून पुणे विद्यापीठ परिसर-उजवीकडे वळून-वाय जंक्शन- विदयापीठ मुख्य प्रवेशव्दारातून बाहेरपडून इच्छितस्थळी जातील. नागरीकांनी वाहतूक बदल मार्गाचा वापर करुन वाहतूक शाखेचे कर्मचारी, स्वयंसेवक यांना सहकार्य करावे, असे आवाहन झेंडे यांनी केले आहे.