पुणे : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडच्या गडगंज संपत्तीबाबत अनेक खुलासे समोर येत आहेत. पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवड मध्ये देखील वाल्मिक कराड याची संपत्ती आळस्याचे समोर आले आहे.
उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहरात देखील वाल्मीक कराड आणि त्याच्या पत्नीच्या नावे वाकड मधील पार्क स्ट्रीट सोसायटीच्या आयव्हरी इमारतच्या 6 व्या मजल्यावर 601 नंबर चा 3.15 करोड पेक्षा अधिक किमतीचा 4 BHK फ्लॅट असल्याचं समोर आले आहे.
यात धक्कादायक बाब म्हणजे कराडने य फ्लॅटचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा मिळकत कर न भरल्यामुळे कर संकलन विभागाने त्याच्या या फ्लॅटवर नोटीस सुद्धा लावली आहे. त्यामुळे वाल्मिक कराड याच्या अडचणीत आणखी वाढ़ होताना पहायला मिळत आहे.