अभ्यास करत नसल्याच्या रागातून बापाने घेतला पोटच्या पोराचा जीव

पुणे : बारामती तालुक्यातुन एक धक्कादायक घटना समोर आहे. तु अभ्यास करत नाही, सारखा बाहेर खेळत असतो, तु तुझ्या आईच्या वळणावर जावून माझी इज्जत घालवणारा दिसतोय असे म्हणत बापाने पोटच्या नऊ वर्षीय पोराचे भिंतीवर डोके आपटून तसेच गळा दाबून खून आहे. या घटनेने बारामती तालुक्यात एकाच खळबळ उडाली आहे.

पियुष विजय भंडलकर (वय ९) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी त्याच्या पित्यासह तिघांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल आला आहे. पित्यानेच गळा दाबत व नंतर भिंतीवर डोके आपटत पियुष याचा खून केला. या प्रकरणात दोघांनी त्याला मदत केली . सहाय्य करण्याची भूमिका घेतली.विजय गणेश भंडलकर, शालन गणेश भंडलकर व संतोष सोमनाथ भंडलकर (सर्व रा. होळ, ता. बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिस अंमलदार सागर विलास चौधरी यांनी फिर्याद दिली. दि. १४ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता राहत्या घरी ही घटना घडली.

विशेष म्हणजे विजय याची आई शालन यांनी हा प्रकार पाहत असतानाही विजय याला विरोध केला नाही. त्यानंतर विजय याच्या सांगण्याप्रमाणे पियुष हा चक्कर येवून पडला आहे, अशी खोटी माहिती त्यांनी दिली. तसेच संतोष भंडलकर याने डाॅ. भट्टड यांच्या दवाखान्यात पियुष आला नेल्यानंतर तेथे विजय याच्या सांगण्यावरून पियुष हा चक्कर येवून पडल्याची खोटी माहिती दिली. डाॅक्टरांनी पियुष याला होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेवून जाण्याचा सल्ला दिला असतानाही तेथे न नेता अगर अगर मयताबाबत गावातील पोलिस पाटील अथवा इतर कोणालाही काहीही न कळवता नातेवाईकांना बोलावून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मयताचे शवविच्छेदन न करता अत्यंविधीची तयारी केली होती, असे फिर्यादीत म्हटले आहे. तयानंतर रोखत पोलिसांनी कारवाई करत अंत्यविधी रोखत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे .