दादांच्या खांद्याला खांदा लावून मीच उभा , नसेल तर पहाटेचा शपथविधी आठवा : माणिकराव कोकाटे

बारामती: बारामती येथे कृषी प्रदर्शनाचे उदघाटन कार्यक्रमासाठी राज्यातील दिग्गज नेते उपस्थित होते. मात्र कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वक्तव्याची चांगलीच चर्चा होऊन सभागृहात एकाच हशा उडाल्याचे पाहायला मिळाले. लवकर उठून कामाला लागण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे. दादांना माहिती आहे मी उशिरा उठतो.दादांनी रात्रीच सांगितलं होतं.. उद्याच्या दिवस तसदी घ्यावी लागेल. तेव्हा मी त्यांना म्हटलं.. जेव्हा गरज असते.. तेव्हा खांद्याला खांदा लावून मी कुठेही उपस्थित असतो. नसेल तर पहाटेचा शपथविधी आठवा मीच त्यावेळी पाठीमागे उभा होतो. असे वक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केले .

बारामतीत कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जागतिक स्तरावरील प्रात्यक्षिक आधारित कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार, संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी पार पडले.या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात कोकाटे बोलत होते. यावेळी एकाच हशा उडाल्याचे पाहायला मिळाले .