सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक, ठाण्यातून घेतले ताब्यात

मुंबई : सुपरस्टार अभिनेता सैफ अली खान याच्यावर शनिवारी मध्यरात्री हल्ला झाला होता. यात सैफ अली खानावर चोराने सहा वार केले होते. त्यातील मनक्या जवळील वार खोलवर होता. यात त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. या प्रकरणात एका माहत्वाची बातमी समोर आली असून हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला आता पोलिसांनी ताब्यात घतेले आहे. शनिवारी मध्यरात्री उशिरा ठाणे येथील हिरानंदानी इस्टेट येथे सुरू असलेल्या मेट्रो बांधकामाजवळील कामगार छावणीतून त्याला अटक करण्यात आली आहे.

अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून आपण चाकू हल्ला केल्याची कबुली या हल्लेखोराने पोलिसांसमोर दिली आहे. पुढील चौकशीसाठी त्याला खार पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं आहे. विशेष म्हणजे आरोपीने विजय दास, बिजॉय दास, बीजे आणि मोहम्मद इलियास अशी अनेक नावे वापरली होती अशी माहिती दिली आहे. हा आरोपी बांगलादेशी असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

याबाबत एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहिती नुसार, हा आरोपी मुंबई येथील एका रेस्टोरंटमध्ये वेटरचे काम करत होता. गेल्या सात-आठ महिन्यांपासून मुंबई आणि ठाण्यात वेगवेगळ्या ठिकाणी काम करत होता. अटकेच्या काही दिवस आधी तो एका कंत्राटदाराबरोबर बांधकाम स्थळावर काम करत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तो खरंच बांगलादेशी आहे का याचा तपास देखील पोलिसांकडून केला जातं आहे.