पालकमंत्री पद न मिळाल्याने भरत गोगावले नाराज, एकनाथ शिंदेंशी चर्चा करणार

मुंबई : राजगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी अदिती तटकरे यांची वर्णी लागल्याने शिवसेनेचे नेते भरत गोगावले नाराज असल्याचे बोलले जात आहे. याबाबात माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

यावेळी गोगावले म्हणाले की , रायगड जिल्ह्यातील सहाही आमदारांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली होती. सगळ्यांनी भरतशेठ पालकमंत्री व्हावेत म्हणून हे सांगितलं होतं. मात्र आलेल्या निकाल हा अपेक्षित आहे धक्कादायक आहे. मनाला पटणारा नाही आहे. मात्र आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्यामुळे ते घेतील तो निर्णय आम्हाला मान्य करावा लागेल, अशी जाहीर नाराजी असलेली प्रतिक्रिया शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे.

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी चांगली रस्सीखेच सुरु होती. शिवसेनेचे भरत गोगावले आणि अदिती तटकरे यांच्यात चांगलीच स्पर्धा लागली होती. यासाठी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी देखील झाल्या होत्या.

भरत गोगावले यांना पालकमंत्री पद मिळावे यासाठी शिवसेनेकडून जोरदार मागणी देखील करण्यात येत होती. मात्र आज जाहीर झालेल्या यादीमध्ये रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची माळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या महिला वा बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या गळ्यात पडली आहे. त्यामुळे यावरून पुन्हा वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रायगडच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेनाने चांगलीच कंबर कसली होती. तशी मोर्चे्बांधणी देखील शिंदे शिवसेने केली होती. मात्र पालकमंत्री पदाची यादी जाहीर आणि रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद पुन्हा अदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आले आहे. आता जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.