बोपोडी येथे मोफत नेत्र तपासणी व नेत्र शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

पुणे : पुण्याच्या माजी उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर मित्रपरिवार आणि रोटरी क्लब ऑफ पुना डाऊनटाऊन , एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व नेत्र शस्त्रक्रिया शिबिर आज बोपोडी येथे सम्यक विहार व विकास केंद्र या ठिकाणी संपन्न झाले.

या शिबिरात ६०० हून अधिक नागरिकांनी नेत्र तपासणी चा लाभ घेतला तसेच ५० हून अधिक नागरिकांनी शस्त्रक्रियेसाठी नोंदणी केली. या ठिकाणी मोफत चष्म्यांचे वाटपही करण्यात आले.

कार्यक्रम प्रसंगी पुण्याच्या माजी उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर, रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र संघटन सचिव परशुराम वाडेकर, रोट, री क्लब ऑफ पूना डाउनटाउन (३१३१) च्या डायरेक्टर डॉ. झिमरा इसराइल, अध्यक्ष प्रो. डॉ. अय्यर, डिस्ट्रिक्ट ऑफिसर परविन सडेकर , पल्लवी साबळे रिपब्लिकन पक्षाचे शिवाजीनगर विधानसभेचे अध्यक्ष अविनाश कदम, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.