पिंपरी : पिंपरी चिंचवड परिसरामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. त्यातच माळुंगे पोलीस स्टेशन हद्दीमधील वरळी परिसरात असणारे एका स्टील कंपनीच्या मालकावर दोन अनोळखी व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात मालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, माळुंगे पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्टील कंपनीच्या मालकावर दोन अनोळखी व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. दुचाकीवरून हेल्मेट घालून आलेल्या अनोळखी व्यक्तींनी हा गोळीबार केला आहे. यापैकी एक गोळी पोटामध्ये व एक गोळी संबंध व्यक्तीच्या कमरे मध्ये लागले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी व्यक्तीला रुग्णाला दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार नेमका कशातून घडला हे अद्याप समोर आलेले नाही. फायरिंग केल्यानंतर आरोपी वराळे ते भांबोली या दिशेने पळून गेल्याची माहिती समोर येत आहे.
ही घटना घडल्यानंतर पोलिसांकडून परिसरामध्ये नाकाबंदी करण्यात आली असून पोलिस नियंत्रण कक्षाला सतर्क करण्यात आले असून पुणे शहर आणि ग्रामीण पोलिसांनाही कळविण्यात आले आहे. खेड आणि शिक्रापूर परिसरातही नाकाबंदी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या घटनेमुळे चाकण परिसरामध्ये गुन्हेगारी वाढते की काय असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे. दिवसाढवळ्या झालेला हा प्रकार सर्वसामान्यांना धडकी भरवणार आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. या घटनेमुळे चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.