भालाफेकपटू नीरज चोप्रा अडकला विवाह बंधनात

नवी दिल्ली : जागतिक ऑलम्पिक स्पर्धेत भारताला दोन वेळा पदक मिळवून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा याचा शुभविवाह केला आहे. सोशल मीडियावर फोटो प्रसिद्ध करून त्याने ही माहिती दिली आहे.

गेल्या अनेक दिवसापासून नीरज चोप्रा याच्या लग्नाची चर्चा रंगली होती. नीरज चोप्राच्या पत्नीचे नाव हिमानी असे असून ती सध्या अमेरिकेत शिक्षण घेत आहे. खूप जवळचे मित्रमंडळी तसेच जवळच्या नातेवाईकांत नीरज आणि हिमानी यांच्या विवाह पार पडला.

ही पोस्ट करताना त्याने मी माझ्या जीवनाचा नवा अध्याय माझ्या कुटुंबासोबत सुरू करत आहे. तसंच त्याने लाल रंगाचा हार्ट इमोजी टाकून नीरज आणि हिमानी असे नाव टाकले आहे. नीरजने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याची पत्नी हिमानी दिसत आहे.

https://x.com/Neeraj_chopra1/status/1881010284317626723?t=h-fXoF2AfYh-CUlqxjR3zQ&s=19

नीरज चोप्रा याने भारताला 2020 सालच्या टोक्यो येथील ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिले होते. त्यानंतर 2024 सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने रौप्य पदक पटकावून दिले होते. मात्र आता विवाह बंधनात अडकला आहे.