जयंतरावांना आपला मुलगा आमदार होत नाही याच दुखणं, आमदार गोपीचंद पडळकर यांची टीका

सांगली : अडीच वर्ष जयंत पाटील जलसंपदा मंत्री होते, पण त्यांनी सांगली जिल्ह्यासाठी काय केले. जयंतरावांना एकच दुखणं आहे, आर आर पाटील यांचा मुलगा आमदार झाला, आपला मुलगा अद्याप आमदार झाला नाही याचा टेन्शन आल आहे. तसेच आर आर पाटलांबरोबर असणाऱ्या अनेक नेत्यांना देखील,आपला मुलगा आमदार झाला नाही, याचं दुखणं आहे, पण तुमची लायकी आणि तुमची क्षमता यामुळे तुमची मुलं,कशी आमदार होणार,असा टोला देखील आमदार पडळकर यांनी जयंत पाटलांसह अप्रत्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवारांना लगावला आहे.


सांगली येथे धनगर समाजाच्या वतीने भाजप आमदारांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी भाषणादरम्यान पडळकर बोलत होते.भाजप आमदार गोपीचंद पडळकर,सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख आणि सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ या तिघांचा सांगलीमध्ये समस्त धनगर समाजाच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते घोंगडी, काठी आणि बाळूमामाची मूर्ती भेट देऊन हा सत्कार संपन्न झाला. या नागरी सत्कार निमित्ताने सांगली शहरातून या तिन्ही आमदारांची जंगी मिरवणूक देखील काढण्यात आली.