रायगड, नाशिकचे पालकमंत्रीपदाला स्थगिती! अदिती तटकरे आणि गिरीश महाजनांना धक्का

मुंबई : पालकमंत्री पदाची यादी जाहीर होताच महायुतिचा वाद चव्हाट्यावर आल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे एका दिवसात दोन जिल्ह्याचे पालकांमंत्री पद रद्द करण्याची वेळ राज्य सरकारावर आली आहे. रायगड आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे अदिती तटकरे आणि गिरीश महाजन यांना धक्का बसला आहे. पुढील आदेश येईपर्यंत या जिल्ह्याचे पालकमंत्री पद रिक्त राहणार आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे यांची रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली होती. तर गिरीश महाजन यांच्याकडे नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं होतं. मात्र, आता या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.

भरत गोगावले रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही होते. मात्र, त्यांना पदापासून वंचित ठेवण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांनी संताप व्यक्त करत राजीनामे दिले होते. तर नाशिकमध्येही पालकमंत्रिपदासाठी महायुतीमध्ये रस्सीखेच सुरु होती. त्यानंतर दोन जिल्ह्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.