Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

पुण्यात चाललय तरी काय..! बारमध्ये गोंधळ घालणाऱ्या तरुणांना कर्मचाऱ्यांकडून मारहाण, व्हिडिओ व्हायरल

पुणे : पुण्यात गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. त्यात आता पुन्हा एक घटना समोर आली आहे. बार मधल्या कर्मचाऱ्यांकडून दारूच्या नशेत असलेल्या दोन तरुणांना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायराल झाला आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून काहींना ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्रीच्या सुमारास बिबवेवाडी परिसरात असणाऱ्या एका बारमध्ये तीन तरुण दारू पिण्यासाठी गेले होते. त्यावेळी दारूच्या नशेत त्या तरुणानी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी बारच्या कर्मचऱ्यांनी त्या तरुणांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी तरुणांना मारण्यास सुरुवात केली. मारताना काठ्या, दांडके, तसेच शस्त्राचा देखील वापर केला.

यानंतर जखमी झालेल्या तरुणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »