रेल्वेला आग लागल्याची अफवा, प्रवाशांनी चालत्या गाडीतून मारल्या उड्या,पण घडला अनर्थ

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पथराडे गावाजवळ एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वेने ब्रेक मारल्यानंतर आगीच्या ठिणग्या उडाल्या. आग लागल्याच्या अफवाने प्रवाशानी थेट उड्या मारल्या. मात्र त्याचवेळी समोरून येणाऱ्या दुसऱ्या रेल्वेने दहा ते बारा जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

आगीच्या भीतीने प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारल्या मारल्या. परंतु समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना उडवलं आहे. या अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्टेशन जवळ हा अपघात आज बुधवारी दुपारच्या सुमारास घडला आहे. मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसने पथराडे रेल्वे स्थानकाजवळ अचानक ब्रेक लावला त्यामुळे एक्सप्रेसच्या चाकांमधून आगीच्या मोठ्या ठिगण्या उडाल्या. त्या काही प्रवाशानी पाहिल्या. त्यांनी आग लागल्याची आराडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे रेल्वेला आग लागल्याची अफवा पसरली त्यामुळे घाबरलेल्या प्रवाशानी चालत्या रेल्वेमध्ये उड्या मारल्या. त्याचवेळी समोरून येणाऱ्या नवी दिल्ली येथून बंगळुरूकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने अनेकांना चिरडले.

या घटनेमुळे जळगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जातं आहे.